Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

team by team
April 3, 2026
in सामाजिक
0
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हनुमान जयंती निमित्त श्री मोठा मारुती मंदिर येथे शौर्य, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमंताच्या गदेचे पूजन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

हिंदू धर्मात गदा हे केवळ एक शस्त्र नसून ती पराक्रम, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि धर्माचे रक्षण करण्याची शक्ती यांचे प्रतीक मानली जाते. भगवान हनुमानांच्या हातातील गदा ही त्यांच्या अद्वितीय बलशक्तीचे तसेच भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहे. गदेचे पूजन केल्याने धैर्य, आत्मविश्वास आणि संकटांशी सामना करण्याची शक्ती प्राप्त होते, असा धार्मिक समज आहे.
या पूजन सोहळ्यावेळी नंदुरबार शहराचे पोलीस निरीक्षक निलेश देसले तसेच उपनिरीक्षक श्री. प्रशांत जाधव, श्री मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी, सचिव कल्याण पाटील, हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील व प्रशांत चौधरी यांच्या हस्ते विधीपूर्वक गदा पूजन करण्यात आले.
यावेळी विलास महाराज यांनी मंत्रोच्चार करून विधिवत पूजा पार पाडली. कार्यक्रमाला हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर चौधरी, हर्षल देसाई, भारती पंडित व आशा वाडीले यांनी परिश्रम घेतले
या उपक्रमामुळे समाजात शौर्य, एकता आणि धर्मभावना वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

Next Post

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add