नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारीतील पाळधी, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार ते गुजरात राज्य मार्ग-6 हा नंदुरबार ते धानोरा दरम्यान धानोरा गावाजवळील मोठा पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या श्रीमती वैशाली पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.