Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

4 एप्रिल ला निश्चित होणार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण

team by team
March 23, 2024
in राजकीय
0
4 एप्रिल ला निश्चित होणार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील बोराळे व समशेरपुर या ०२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे तालुकास्तरावर आरक्षण निश्चिती ४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, नंदुरबार येथे होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) गोविंद दाणेज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

 

ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील अधिसूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकुण १५ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याने ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ या कालावधीसाठी बिगर आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाबाबत निर्देश दिलेले असून १५ ग्रामपंचायतींचे ४ सरपंच पदे नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गसह आरक्षित केल्याचे अधिसुचित केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या १५ ग्रामपंचायतींसाठी सन २०२० मध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २ सरपंच पदे ही नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव होती. त्यामुळे अतिरिक्त २ सरपंच पदांसाठी ना.मा.प्र. प्रवर्गासाठी आरक्षित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हे आरक्षण ०१ जानेवारी २०२४ ते दिनांक ०४ मार्च २०२५ या कालावधीसाठी सार्वत्रिक निवडणूका होऊन गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी लागू असणार आहे.

 

 

आरक्षण निश्चितीच्या सभेसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे नागरिक, सदस्य यांना उपस्थित रहावे असेही आवाहन उपजिल्हाधिकारी श्री. दाणेज यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री पी के अण्णा पाटील फाऊंडेशन व जायन्टस ग्रुप, जायन्टस सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 68 दत्यांचे रक्तदान

Next Post

दोन वर्षानंतर धानोरा गावाजवळील पुल वाहतुकीसाठी खुला

Next Post
दोन वर्षानंतर धानोरा गावाजवळील पुल वाहतुकीसाठी खुला

दोन वर्षानंतर धानोरा गावाजवळील पुल वाहतुकीसाठी खुला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add