शहादा l प्रतिनिधी
रक्तदान करा आणि रुग्णाना जीवदान द्या. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. समाजाला आपणास काही तरी देणे आहे, या भावनेतून प्रत्येक नागरिकाने रक्तदान केले पाहिजे. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकतो.
रक्तदान ही काळाची गरज आहे, कारण रक्त हे कुठल्याही कारखान्यात बनविले जात नाही त्यासाठी मनुष्याच्याच रक्ताची गरज भासते. रक्तदान केल्याने समाज ऋण फेडण्याची फार मोठी संधी मिळते.
रक्तदानामुळे अशक्तपणा येत नाही किंवा संसर्ग होत नाही. मानवतेच्या दृष्टीने रक्तदात्यांची संख्या वाढविणे ही काळाची गरज आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताच्या तुटवडा भासतो मागणी वाढते आणि पुरवठा कमी पडतो या दृष्टीने श्री पी के अण्णा पाटील फाऊंडेशन व जायन्टस ग्रुप, जायन्टस सहेली ग्रुप शहादा तसेच पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन व मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका सौ. माधवीताई पाटील, जायन्टस ग्रुपचे अध्यक्ष डॉ विवेक पाटील, सहेली ग्रुप च्या अध्यक्षा सौ.स्वाती पाटील, डॉ राजेश जैन, डॉ स्मिता जैन, आर.टी. पाटील, कैलास भावसार, माणक चौधरी, इस्माईल राजा, संजय सोनार, सुरेश चव्हाण, भूषण बाविस्कर, के. के. सोनार, आशा चौधरी, अर्चना सोनार, नवजीवन ब्लड बँक धुळे चेे संचालक डॉ सुनील चौधरी, प्राचार्य डॉ एस. पी.पवार, प्राचार्य डॉ एम् के पटेल, प्राचार्य डॉ पी.एल.पटेल, प्राचार्य बी.के.सोनी आदी मान्यवर उपस्थित होते होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरात एकुण 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी नवजीवन ब्लड बँक धुळे चेे संचालक डॉ सुनील चौधरी व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित राहून रक्त संकलन केले. या शिबिरासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर भाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सदर शिबीराच्या यशस्वीेतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.