नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ.हिना गावीत यांची भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी गुरुवार रोजी जाहीर करण्यात आली. यात नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ. हिना गावीत यांची दुसऱ्यांदा राष्ट्रीय प्रवक्तेपदी फेरनिवड करण्यात आली. या कार्यकारिणीत भाजपच्या राज्य उपाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ तसेच नंदुरबारच्या खासदार डॉ.हीना गावित यांचा समावेश करण्यात आला आहे . त्याचबरोबर पंकजा मुंडे , विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिवपदी तर खासदार हीना गावित यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे . राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तेरा जणांचा समावेश करण्यात आला आहे . यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , पीयुष गोयल , चित्रा वाघ , प्रकाश जावडेकर , विनय सहस्त्रबुद्धे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे . तर विनोद तावडे , सुनील देवधर , पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे . खासदार डॉ.हिना गावीत यांची निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.