Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कौशल्य विकास विभाग केंद्राचे आँनलाईन उद्घाटन

team by team
March 16, 2024
in शैक्षणिक
0
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कौशल्य विकास विभाग केंद्राचे आँनलाईन उद्घाटन

शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संचालित कौशल्य विकास केंद्रांचे आँनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा व महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या उपायुक्त श्रीमती निधी चौधरी यांचा उपस्थितीत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले.

महाराष्ट्रातील युवकांना स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील महाविद्यालयांना कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याविषयी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार राज्यातील 108 महाविद्यालयांनी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास केंद्राचे विविध अभ्यासक्रम आपल्या महाविद्यालयांमध्ये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली.

या महाविद्यालयांच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आँनलाईन करण्यात आले.कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आँनलाईन उद्घाटन सोहळ्यासाठी पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास विभागा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीण्यता यांच्या आधारे व्यक्ती स्वयंपूर्ण बनू शकते.तसेच युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे महत्वाचे आहे याची माहिती त्यांनी दिली.प्रा.मयूर चौधरी यांनी महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राबद्दल माहिती देत विद्याथ्यांना या सर्व कौशल्यांची कशी आवश्यकता आहे ते सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कौशल्य विकास विभागाचे प्रा.भगवान पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचा रुटमार्च

Next Post

मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

Next Post
मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add