नंदुरबार l प्रतिनिधी
युनिसेफ अर्थसहाय्यीत प्रकल्पांतर्गत कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांना एनआरएचएम अंतर्गत पुढील नियुक्ती आदेश द्यावेत, या मागणीसाठी उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनाची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लाहाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या संदर्भात लेखी आश्वासन दिले. फोन कर्मचाऱ्यांनी या आश्वासनाने आंदोलन स्थगित केले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्रातील सर्व कर्मचारी हे १७ मे २०१७ पासून युनिसेफ अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. दुर्गम भागातील महिलांना स्थानिक व त्यांना अवगत असलेल्या भाषेत त्यांच्याकडून माहिती प्राप्त करून त्यांना मार्गदर्शन, कुपोषित बालकांना उपचार व पोषण आहार देण्याचे काम केले आहे. बालकांना सोयी सुविधांअभावी नंदुरबार येथे संदर्भित करण्यात येते. त्यासाठी त्यांच्या समुपदेशनाचे काम कर्मचारी करत होते. कार्य मुक्तच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची त्यांची मागणी आहे.
या मागणीसाठी उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनावेळी मालती वळवी, वर्षा सायसिंग पावरा, पार्वती संपत वळवी, कांचन टेड्या वळवी, शीतल करणसिंग वळवी, अनिता सोत्या वळवी, सुनंदा विजेसिंग वळवी, पूजा संजय वन्धी राज पाटील राजकुमार वळवी राज राजपूत ,इम्तियाज पटेल, लतीका राजपूत, चेतन साळवे सुनिता ताई वळवी उपास्थित होते. या आंदोलनाच्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लाहाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या संदर्भात लेखी आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांनी या आश्वासनाने आंदोलन स्थगित केले आहे.