नंदुरबार l प्रतिनिधी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान त्वरित मिळावे अशी मागणी शिवसेना उबाठा गटाने केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी कमी पावसामुळे अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच जनावरांच्या चाराच्या प्रश्न देखील गंभीर झाला असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून 1200 पेक्षा अधिक महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे.
सदर शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले त्यांचे अनुदान आजतागायत मिळालेले नाही .तरी शासनाने मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे. तसेच शासनाकडू व विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचा एक रुपयांमध्ये विमा काढण्यात येत आहे या विमा लची रक्कम देखील अद्याप पावतो शेतकऱ्यांना मिळालेली नाही तरी विमा ची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी ,अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
जर शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान लवकर मिळाले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.व यास सर्वस्व जबाबदार शासन राहील. या मागणीचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, उपमहानगर प्रमुख इम्तियाज पटेल, युवा जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील, तालुकाप्रमुख विजय ठाकरे, शहर प्रमुख राजधर माळी, विक्रम हासानी व शिवसैनिक उपस्थित होते..