शहादा l प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष शहादा तालुका ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांसाठी जागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.
भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हा व शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या महिला, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी गुर्जरी खाद्य संस्कृती ग्रंथाच्या लेखिका सौ.माधवीबेन मकरंद पाटील,भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.कल्पनाताई पंड्या, महिला मोर्चाच्या जिल्हा सहसंयोजक सौ.रोहिनीताई भावसार, जिल्हा उपाध्यक्षा सौ.अनामिका चौधरी, सौ.ललिताताई सोनवणे,जिल्हा सचिव सौ.किन्नरीताई सोनार,तालुका अध्यक्षा सौ.ज्योतीताई पाटील,उपाध्यक्षा सौ.मनिषाबेन पाटील,सौ.संगिताताई जैस्वाल,सौ.सुरेखाताई पाटील,सौ.संगिताताई पाटील,सरचिटणीस सौ.पूजाताई पाटील, मनस्विनी पाटील,रत्नाताई पाटील, ललिता देसले, कल्पना पाटील, योगिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लोणखेडा, पुरूषोत्तमनगर, डोंगरगाव,
गोगापूर,कवळीथ,कर्जोत, रामपूर आदि गावातील आशा वर्कर, आरोग्य केंद्र कर्मचारी, शालेय कर्मचारी, सेविकांची उपस्थिती होती.केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.महिला सक्षमीकरणासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.कुटूंब व राष्ट्र विकासातील महिला योगदानाबद्दल चर्चा करण्यात आली.
शहादा तालुक्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.सूत्रसंचालन सौ.आरती पाटील यांनी केले.आभार सौ.पूजा पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरती ठाकरे,लक्ष्मी मंदीर यांच्यासह तालुका ग्रामीण महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.