नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने महिला दिवस निमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या माजी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयात झालेल्या या उपक्रमाप्रसंगी शहरातील व परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पोलीस, वाहतूक पोलीस, शिक्षिका, स्वच्छता कर्मचारी, राजकीय पदाधिकारी,आरोग्य सेविका यांची उपस्थिती होती. या महिलांच्या भगवी शाल देऊन सत्कार माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती दीपमाला पाडवी,माजी नगरसेविका भारती राजपूत, सोनिया राजपूत,मनीषा वळवी,ज्योती पाटील,पं.स सदस्य अंजना वसावे,बेगाबाई भील,कलाबाई भील,बायजाबाई भील,एनटीव्हीएसचा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचा प्राचार्य वैशाली शेवाळे,महिला शहर प्रमुख वैशाली माळी, युवती सेनेचा जिल्हा प्रमुख जयश्री मराठे,महिला कार्यकर्त्या मीना विजय माळी आदी उपस्थित होते.