नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विजयसिंग गिरासे व व्हाईस चेअरमनपदी रवींद्र वाघ यांची बिनविरोध निवड झाली.
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी गुरुवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. विजयसिंग गिरासे यांनी चेअरमनपदासाठी तर व्हा.चेअरमनपदासाठी रवींद्र वाघ यांनी नामांकन दाखल केले. एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोधाची प्रक्रिया पार पडली.
यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी,शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील,शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे यांनी नवनियुक्त चेअरमन व व्हा.चेअरमन यांच्या सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय कुलकर्णी तर सहाय्यक म्हणून धाडूसिंग गिरासे यांनी कामकाज पाहिले. यावेळी संचालक किशोर पाटील,आनंदसिंग गिरासे, छगन पाटील,विठ्ठल मराठे,मच्छिंद्र पाटील,मीराबाई गिरासे,आशाबाई मराठे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.