नंदुरबार l प्रतिनिधी
संत श्री आसाराम बापू यांचे वय ८७ वर्षे असून गेली ११वर्षे कारागृहात आहेत. ते राष्ट्रीय संत, सनातन हिंदू वैदिक धर्माचे संवाहक, तसेच धर्मांतर रोखण्यासाठी सदैव पुढ़ाकार घेणारे संत आहेत। आणि गेल्या ५० वर्षांपासून भारतातील प्रत्येक गावात फिरुन सत्संग कीर्तन द्वारे बापूजिनी धर्म प्रसार केला आहे। असे असूनही त्यांना जामीन अथवा पैरोलवर आतापर्यंत सोडण्यात आलेले नाही. त्यांची प्रकृती खूपच खालावली असल्याने त्यांना आयुर्वेदिक उपचार मिळावे त्यांना जामीन अथवा पैरोलवर आयुर्वेदिक उपचारासाठी सोडावे या न्याय मागणीसाठी शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी १० वाजता मोठा मारुती मंदिरापासून मूक मोर्चा योग वेदांत समितीतर्फे काढण्यात आला. मोर्चामध्ये संत संतोष चैतन्य महाराज मेलन, संत प्रकाश चैतन्य महाराज , संत श्री प्रविणदास महाराज, मेंदराना, हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, विहिप चे जिल्ला मंत्री विजय सोनवने तसेच योग वेदांत समितीचे अजय शर्मा,प्रवीण रेलन,अंबालाल पटेल,पूनाभाई पटेल,विजय माली,चंद्रशेकर मगरे,राजू दमानि,मधु सिंधी सह शेकडो हिंदुत्ववादी, संत श्री आसाराम बापूजींचे साधक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात संत श्री आसाराम बापू यांचा प्रतिमेची गुरू आरती संत, महंत यांचा हस्ते करण्यात आली. मोर्चेकरांनी बापू निर्दोष है, बापू को न्याय दो, बापूजी को रिहा करो असे फलक हातात घेतले होते. मुक मोर्चा मोठा मारुती मंदिर येथून प्रारंभ होऊन अंधारे स्टॉप, जुनी नगरपालिका, शास्त्री मार्केट, हुतात्मा चौक, गणपती मंदिर, सोनार खुंट, जळका बाजार, साक्री नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. मोर्चेकरांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन भारताचे महामहिम राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्री राजस्थान, मुख्यमंत्री गुजरात सरकार,हिना गावित खासदार नंदुरबार लोकसभा, मिलिंद पलांडे, सरचिटणीस, विश्व हिंदू परिषद, दत्तात्रेय होसबळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याना पाठविण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि साधक, भक्त सहभागी झाले होते.