Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संत श्री आसाराम बापू यांना न्याय द्या, मुक मोर्चातुन साधु संत आणि, हिंदुत्ववादी यांची मागणी

team by team
March 2, 2024
in सामाजिक
0
संत श्री आसाराम बापू यांना न्याय द्या, मुक मोर्चातुन साधु संत आणि, हिंदुत्ववादी यांची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
संत श्री आसाराम बापू यांचे वय ८७ वर्षे असून गेली ११वर्षे कारागृहात आहेत. ते राष्ट्रीय संत, सनातन हिंदू वैदिक धर्माचे संवाहक, तसेच धर्मांतर रोखण्यासाठी सदैव पुढ़ाकार घेणारे संत आहेत। आणि गेल्या ५० वर्षांपासून भारतातील प्रत्येक गावात फिरुन सत्संग कीर्तन द्वारे बापूजिनी धर्म प्रसार केला आहे। असे असूनही त्यांना जामीन अथवा पैरोलवर आतापर्यंत सोडण्यात आलेले नाही. त्यांची प्रकृती खूपच खालावली असल्याने त्यांना आयुर्वेदिक उपचार मिळावे त्यांना जामीन अथवा पैरोलवर आयुर्वेदिक उपचारासाठी सोडावे या न्याय मागणीसाठी शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी १० वाजता मोठा मारुती मंदिरापासून मूक मोर्चा योग वेदांत समितीतर्फे काढण्यात आला. मोर्चामध्ये संत संतोष चैतन्य महाराज मेलन, संत प्रकाश चैतन्य महाराज , संत श्री प्रविणदास महाराज, मेंदराना, हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, विहिप चे जिल्ला मंत्री विजय सोनवने तसेच योग वेदांत समितीचे अजय शर्मा,प्रवीण रेलन,अंबालाल पटेल,पूनाभाई पटेल,विजय माली,चंद्रशेकर मगरे,राजू दमानि,मधु सिंधी सह शेकडो हिंदुत्ववादी, संत श्री आसाराम बापूजींचे साधक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात संत श्री आसाराम बापू यांचा प्रतिमेची गुरू आरती संत, महंत यांचा हस्ते करण्यात आली. मोर्चेकरांनी बापू निर्दोष है, बापू को न्याय दो, बापूजी को रिहा करो असे फलक हातात घेतले होते. मुक मोर्चा मोठा मारुती मंदिर येथून प्रारंभ होऊन अंधारे स्टॉप, जुनी नगरपालिका, शास्त्री मार्केट, हुतात्मा चौक, गणपती मंदिर, सोनार खुंट, जळका बाजार, साक्री नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. मोर्चेकरांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

त्यानंतर मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन भारताचे  महामहिम राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्री राजस्थान, मुख्यमंत्री गुजरात सरकार,हिना गावित खासदार नंदुरबार लोकसभा, मिलिंद पलांडे, सरचिटणीस, विश्व हिंदू परिषद, दत्तात्रेय होसबळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याना पाठविण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि साधक, भक्त सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खा. डॉ. हिना गावित यांच्या विकासकामांचा बोलबाला; 10 कोटींच्या निधीतून विविध विकास कामांचे केले लोकार्पण-भूमिपूजन

Next Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शिंदगव्हाणला विकास कामांचे भूमिपूजन

Next Post
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शिंदगव्हाणला विकास कामांचे भूमिपूजन

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शिंदगव्हाणला विकास कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add