Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता

Mahesh Patil by Mahesh Patil
October 6, 2021
in राजकीय
0
नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकींचे निकाल लागले असून ५ पैकी शिवसेना ४ तर भाजपा १ जागेवर विजयी झाले. या निवडणुकीत भाजपाला २ जागांचा फटका बसला असून शिवसेनेचा २ जागा वाढल्या आहेत. सद्यास्थितीला भाजपा ९, शिवसेना ८ तर ३ जागेवर कॉंग्रेसचे उमेदवार आहे. त्यामुळे भविष्यात नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे.
नंदुरबार पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत गुजरभवाली, पातोंडा, होळतर्फे हवेली, नांदर्खे गण, गुजरजांभोली गणांमध्ये निवडणुक झाली. त्याची आज मतमोजणी झाली. या होळतर्फे हवेली गणात भाजपाच्या सिमा जगन्नाथ मराठे यांना (२६८८) तर शिवसेनेच्या स्वाती दिपक मराठे  यांना (२५७७) मते मिळाली. त्यामुळे या गणात भाजपाच्या सिमा मराठे या १११ मतांनी विजयी झाल्या तर गुजरभवाली गणात शितल धर्मेंसिंग परदेशी  शिवसेना (३३९५), पल्लवी विश्‍वनाथ वळवी  कॉंग्रेस (२४६६), मधुमती मोहन वळवी भाजप(२२७८) मते मिळाले यात गुजरभवाली गणात शितल धर्मेंसिंग परदेशी ९२१ मतांनी विजयी झाले तर पातोंडा गणात यमुनाबाई गुलाब नाईक राष्ट्रवादी (८५८), लताबेन केशव पाटील भाजप (२२५२), दिपमाला अविनाश भिल शिवसेना (३४००) मते पडले. त्यात शिवसेनेच्या दिपमाला अविनाश भिल या (११२८) मतांनी विजयी झाल्या. तर नांदर्खे प्रल्हाद चेनसिंग राठोड शिवसेना ३५२८, सुनिल धर्मा वळवी भाजप (२८३९) मते मिळाली. यात शिवसेनेचे प्रल्हाद चेनसिंग राठोड हे ७७६ मतांनी विजयी झाले तर गुजरजांभोली गणात रंजना राजेश नाईक कॉंग्रेस (१८००), सुनिता गोरख नाईक भाजप (२१२१), तेजमल रमेश पवार शिवसेना (२३४०) मते मिळाली. यात शिवसेनेच्या तेजमल रमेश पवार यांना २१९ मतांनी विजयी झाले. दरम्यान या रिक्त झालेल्या ५ गणात शिवसेनेकडे गुजरभवाली, होळतर्फे हवेली हे दोन गण तर भाजपाकडे पातोंडा, नांदर्खे, गुजरजांभोली हे गण होते. यात होळतर्फे हवेली येथे शिवसेनेचा उमेदवार पराभूत होवून तेथे भाजपा विजयी झाले आहे. तर इतर ४ गणात शिवसेना विजयी झाली आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपाला २ जागांचे नुकसान झाले असून शिवसेनेला २ जागांचे फायदा झाला आहे.
नंदुरबार पंचायत समितीच्या २० जागांसाठी जानेवारी २०२० ला झालेल्या निवडणुकीत भाजपाने ११ जागेवर शिवसेना ५ जागेवर, कॉंग्रेस ३ जागेवर तर एकावर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. होळतर्फे हवेली गणातील अपक्ष उमेदवार दिपक मराठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या ६ जागा होत्या. दरम्यान या पोटनिवडणुकीमुळे सदस्यांचे पक्षीय बलाबल बदले आहे. आता भाजपा ९, शिवसेना ८ तर ३ कॉंग्रेस सदस्य आहेत. सद्या नंदुरबार पंचायत समितीवर भाजपाचा सभापती आहे. भविष्यात शिवसेना व कॉंग्रेस एकत्र आल्यास सत्तांतराचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काळात नंदुरबार पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा राहतो की, आघाडीचा हे येणार काळच ठरवेल.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पंचायत समितीत सत्तांतर ?, पांच गणापैकी ४ शिवसेना तर १ गणात भाजपा विजयी

Next Post

शहादा पंचायत समितीत सत्तांतर, कॉंग्रेसने सिद्ध केले वर्चस्व

Next Post

शहादा पंचायत समितीत सत्तांतर, कॉंग्रेसने सिद्ध केले वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लावू नये,जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्याची बिरसा फायटर्सची मागणी

आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लावू नये,जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्याची बिरसा फायटर्सची मागणी

May 31, 2023
तापी नदी परिसराची स्वच्छता,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारचा पर्यावरण पूरक उपक्रम

तापी नदी परिसराची स्वच्छता,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारचा पर्यावरण पूरक उपक्रम

May 31, 2023
अरे व्वा : वर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये

अरे व्वा : वर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये

May 31, 2023
केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

May 31, 2023
माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

May 30, 2023
अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

May 30, 2023

एकूण वाचक

  • 5,503 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group