शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील ८ पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ४ जागा, भाजपाने ३ तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळविला आहे. मात्र, या निकालामुळे भाजपाच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीवर कॉंग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहे.
तालुक्यातील पंचायत समितीच्या ८ गणांसाठी काल मतदान घेण्यात आले. आज मतमोजणी करण्यात आली. या निवडणूकीत ८ पैकी ४ जागांवर कॉंग्रेसने विजय मिळविला असून भाजपाने तीन जागांवर विजय मिळविला आहे. एक जागा राष्ट्रवादीकडे आली आहे. या निकालामुळे भाजपाच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीवर कॉंग्रेसने वर्चस्व सिद्ध केले असून या पंचायत समितीवर सत्तांतर होणार आहे.
सुलतानपूर गण- ताई रामदास खेडकर (१४९९ भाजप), मुन्नी दिनेश पवार (२६७, अपक्ष), वैशाली किशोर पाटील (२८५२, कॉंग्रेस विजयी), जयवंता सुभाष शेमळे (५९७, राष्ट्रवादी).
खेडदिगर गण- प्रमिला अनिल चव्हाण (१०४२, राष्ट्रवादी), विद्या विजय चौधरी (१५७७, भाजप), संगीता शांतीलाल पाटील (२३१२, कॉंग्रेस विजयी),
मंदाने गण- कुसुमबई चुनीलाल जाधव (७५७, अपक्ष), रोहिणी दिनेश पवार (२७८२, कॉंग्रेस विजयी), हेमांगी प्रमोद पाटील (२१४६ भाजप), पतिबाई रामदास वाघ (४८३, राष्ट्रवादी),
डोंगरगाव गण- देवेंद्रसिंग दिलीपसिंग गिरासे (१०००, राष्ट्रवादी), विलास परशुराम निकुंभ (२४०, अपक्ष), मोरे ताई वसंत (११६१, कॉंग्रेस), याईस श्रीराम धनराज (३३४९, भाजप विजयी),
मोहिदा तर्फे हवेली गण- कल्पना श्रीराम पाटील (३२६६, भाजप विजयी), शांता दिलीप पाटील (२०५३, कॉंग्रेस),
जावदे तर्फे बोरद गण- गणेश लखेसिंग गिरासे (१२६०, शिवसेना), निमा ओरसिंग पटेल (२००९ कॉंग्रेस विजयी), रविंद्र रमाकांत पाटील (१८११, भाजप), वसंत जाण्या पाडवी (११४७, राष्ट्रवादी),
पाडळदे बुद्रुक गण- दिनेश वेडु पाटील (५९४, कॉंग्रेस), सुदाम मंगळूू पाटील (२९४८, राष्ट्रवादी विजयी), दंगल तुकाराम सोनवणे (२२६८ भाजप)
शेल्टी गण- आनंदा सुकलाल कोळी (३३५, राष्ट्रवादी), किशोर छोटूलाल पाटील (२७३५, भाजप विजयी), विलास दाजू मोरे (१९९१, कॉंग्रेस), रवींद्र भगवान शिंदे (१७१, अपक्ष).