नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकींचे निकाल लागले असून ५ पैकी शिवसेना ४ तर भाजपा १ जागेवर विजयी झाले. या निवडणुकीत भाजपाला २ जागांचा फटका बसला असून शिवसेनेचा २ जागा वाढल्या आहेत. सद्यास्थितीला भाजपा ९, शिवसेना ८ तर ३ जागेवर कॉंग्रेसचे उमेदवार आहे. त्यामुळे भविष्यात नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे.
नंदुरबार पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत गुजरभवाली, पातोंडा, होळतर्फे हवेली, नांदर्खे गण, गुजरजांभोली गणांमध्ये निवडणुक झाली. त्याची आज मतमोजणी झाली. या होळतर्फे हवेली गणात भाजपाच्या सिमा जगन्नाथ मराठे यांना (२६८८) तर शिवसेनेच्या स्वाती दिपक मराठे यांना (२५७७) मते मिळाली. त्यामुळे या गणात भाजपाच्या सिमा मराठे या १११ मतांनी विजयी झाल्या तर गुजरभवाली गणात शितल धर्मेंसिंग परदेशी शिवसेना (३३९५), पल्लवी विश्वनाथ वळवी कॉंग्रेस (२४६६), मधुमती मोहन वळवी भाजप(२२७८) मते मिळाले यात गुजरभवाली गणात शितल धर्मेंसिंग परदेशी ९२१ मतांनी विजयी झाले तर पातोंडा गणात यमुनाबाई गुलाब नाईक राष्ट्रवादी (८५८), लताबेन केशव पाटील भाजप (२२५२), दिपमाला अविनाश भिल शिवसेना (३४००) मते पडले. त्यात शिवसेनेच्या दिपमाला अविनाश भिल या (११२८) मतांनी विजयी झाल्या. तर नांदर्खे प्रल्हाद चेनसिंग राठोड शिवसेना ३५२८, सुनिल धर्मा वळवी भाजप (२८३९) मते मिळाली. यात शिवसेनेचे प्रल्हाद चेनसिंग राठोड हे ७७६ मतांनी विजयी झाले तर गुजरजांभोली गणात रंजना राजेश नाईक कॉंग्रेस (१८००), सुनिता गोरख नाईक भाजप (२१२१), तेजमल रमेश पवार शिवसेना (२३४०) मते मिळाली. यात शिवसेनेच्या तेजमल रमेश पवार यांना २१९ मतांनी विजयी झाले. दरम्यान या रिक्त झालेल्या ५ गणात शिवसेनेकडे गुजरभवाली, होळतर्फे हवेली हे दोन गण तर भाजपाकडे पातोंडा, नांदर्खे, गुजरजांभोली हे गण होते. यात होळतर्फे हवेली येथे शिवसेनेचा उमेदवार पराभूत होवून तेथे भाजपा विजयी झाले आहे. तर इतर ४ गणात शिवसेना विजयी झाली आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपाला २ जागांचे नुकसान झाले असून शिवसेनेला २ जागांचे फायदा झाला आहे.
नंदुरबार पंचायत समितीच्या २० जागांसाठी जानेवारी २०२० ला झालेल्या निवडणुकीत भाजपाने ११ जागेवर शिवसेना ५ जागेवर, कॉंग्रेस ३ जागेवर तर एकावर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. होळतर्फे हवेली गणातील अपक्ष उमेदवार दिपक मराठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या ६ जागा होत्या. दरम्यान या पोटनिवडणुकीमुळे सदस्यांचे पक्षीय बलाबल बदले आहे. आता भाजपा ९, शिवसेना ८ तर ३ कॉंग्रेस सदस्य आहेत. सद्या नंदुरबार पंचायत समितीवर भाजपाचा सभापती आहे. भविष्यात शिवसेना व कॉंग्रेस एकत्र आल्यास सत्तांतराचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काळात नंदुरबार पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा राहतो की, आघाडीचा हे येणार काळच ठरवेल.