नंदुरबार l प्रतिनिधी
गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे तर्फे नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात दोन दिवशीय हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेला आज दि.१० फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात आहे. यात राज्यभरातून अकरा नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे.
नंदुरबार येथे दि.१० व ११ फेब्रुवारी दरम्यान कालकथित जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ दि हस्ती को-ऑप बँक लि. प्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, जळगांव, चोपडा, नंदुरबार, धुळे, शहादा येथील नाट्यसंस्था सहभागी होणार असून ११ एकांकीकांची नोंद झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य बी.एस.पाटील राहणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दि हस्ती को-ऑप बँक लि. गिरीविहार शाखेचे कमेटी चेअरमन धनेश लूणावत, ज्येष्ठ साहित्यिक दिनानाथ मनोहर, दि हस्ती को-ऑपरेटिव बँक लिमि. नंदुरबार शाखेचे कमिटी सदस्य प्रकाश नानकानी तसेच मान्यवर म्हणून माजी नगरसेवक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, युवा उद्योजक मिलिंद पहुरकर, जयहिंद इलेक्ट्रॉनिकचे नरेश नानकाणी, अण्णासाहेब पी.के.पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष शितलकुमार पाटील, जय हिंदळा माता ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे सचिव गिरीश वसावे, कृषी अधिकारी विजय मोहिते, दैनिक सकाळ जिल्हा प्रतिनिधी धनराज माळी, नवोदय विद्यालय अक्कलकुवा चे सुरेंद्र देवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तर या स्पर्धेचे पारितोषीक वितरण ११ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम तथा सिनेमा नाट्य अभिनेते हेमंत पाटील व कुणाल मेश्राम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून दि हस्ती को-ऑप लि. दोंडाईचाचे चेअरमन कैलास जैन, नंदुरबार जिल्हा प्राथमिक व माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, एस.व्ही.एन.आय.टी. सुरतचे प्रा.डॉ.शिवानंद सुर्यवंशी तर मान्यवर म्हणून कृषी अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, उद्योजक आनंद जैन, जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील, सिने निर्माता तथा सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोज वसईकर, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, स्टेट बँक ऑफ इंडिया हाऊसिंग लोन कौन्सिलर मनीष बिरारे, बालरोगतज्ञ डॉक्टर समिधा नटावदकर-पाने, मुख्याध्यापक बी.एस.पवार, दंतचिकित्सक डॉ.प्रियंका संजय चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे.
या दोन दिवशीय चालणार्या एकांकीका स्पर्धेचे परिक्षण केंद्रीय संचार ब्युरो, सूचना व प्रसारण मंत्रालयाचे प्रबंधक डॉ.जितेंद्र पानपाटील,सुप्रसिद्ध सिने तथा नाट्य अभिनेते कुणाल मेश्राम, सिने तथा नाट्य अभिनेता प्रदीप कांबळे हे मान्यवर करणार आहेत. हस्ती-जिभाऊ करंडक या एकांकीका स्पर्धेतील एकांकीका पाहण्यासाठी कुठलही प्रवेश फी नसून सर्वांना विनामुल्य पाहता येणार आहे. तरी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजन समितीचे नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह तुषार सांगोरे, क्षमा वसईकर, कुणाल वसईकर, जितेंद्र खवळे, राहुल खेडकर, सागर कदम, काशिनाथ सूर्यवंशी, चिदानंद तांबोळी, पुरुषोत्तम विसपुते, हर्षल महिरे, प्रफुल्ल महिरे, जितेंद्र पेंढारकर, पार्थ जाधव यांनी केले आहे.
दोन दिवसात सादर होणार्या एकांकीका
दिनांक १० फेब्रुवारी शनिवार – दुपारी २ ते ३ वाजता – झपाटलेली चाळ (निर्माण, नंदुरबार), दुपारी ३ ते ४ वाजता – भभूत्या (आय.एम.आर.कॉलेज जळगाव), सायंकाळी ४ ते ५ वाजता- कात (लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था नाशिक विभाग, शाखा धुळे), सायंकाळी ५ ते ६ वाजता – अंगाई (पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा), सायंकाळी ६ ते ७ वाजता – (लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था नाशिक विभाग, शाखा नाशिक).
दिनांक ११ फेब्रुवारी रविवार रोजी – सकाळी ११ ते १२ वाजता – सुरवंटाचं डिफ्रॅगमेंटेशन ( युवा रंग फाउंडेशन नंदुरबार), दुपारी १२ ते १ वाजता – रंसुरी (विजिकिषा थिएटर नाशिक), दुपारी १ ते २ वाजता – संपर्क क्रमांक (कलासक्त, अंधेरी मुंबई), दुपारी २.३० ते ३.३० वाजता – सेकंड हॅन्ड (महात्मा गांधी शिक्षण मंडळ कला विज्ञान महाविद्यालय चोपडा), दुपारी ३.३० ते ४.३० वाजता – चांदणी (फ्लाईंग बर्ड फिल्म अँड थिएटर फाउंडेशन जळगाव), सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता – इंटरोगेशन (क्रिएटिव्ह कार्टी मुंबई)