Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंतप्रधान कार्यालयातून आला फोन अन खा.डॉ.हिना गावित यांना पंतप्रधानांनी दिला सुखद धक्का

Mahesh Patil by Mahesh Patil
February 9, 2024
in राजकीय
0
पंतप्रधान कार्यालयातून आला फोन अन खा.डॉ.हिना गावित यांना पंतप्रधानांनी दिला सुखद धक्का

नंदुरबार l प्रतिनिधी
दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह मोजक्या सहा खासदारांसमवेत स्नेहभोजन केले आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडून मतदार संघात केलेल्या विकास कामांची माहिती घेत दिलखुलास अराजकीय गप्पा करीत सुखद धक्का दिला.

 

 

 

याविषयीचा सविस्तर वृत्तांत असा की, खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या मोबाईलवर आज अचानक पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि “पी एम साहेबांनी बोलावलंय; ताबडतोब उपस्थित व्हा” असा निरोप पलीकडून देण्यात आला. हा निरोप ऐकताच खासदार डॉक्टर हिना गावित विचारात पडल्या आणि आपल्या हातून काय घडले असावे, का बोलावले असावे यावर विचार करीत त्या ताबडतोब पंतप्रधान कार्यालयात धावतच उपस्थित झाल्या.

 

 

 

तिथे अन्य मोजके पाच खासदार देखील बोलावण्यात आले होते आणि त्यांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. परंतु पुढल्या काही क्षणात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समोर उपस्थित झाले आणि सर्वांना धक्का देणारा घटनाक्रम सुरू झाला.
खुद्द आपले हेडमास्टर समोर उभे आहेत म्हटल्यावर या खासदारांची मनातून घालमेल सुरू होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं हसून स्वागत केलं तेव्हा या सर्वांना धीर आला. काही औपचारिक वाक्य बोलून झाल्यावर “चला आपल्याला एका ठिकाणी जायचे” असे म्हणून पंतप्रधान मोदीजी स्वतः पुढे चालू लागले.

 

 

 

त्यांच्या मागून खासदार डॉक्टर हिना गावित आणि अन्य खासदार अधिक काही न बोलता चालू लागले. चालत चालत त्या मोजक्या खासदारांना घेऊन मोदीजी चक्क संसद भवनाच्या कॅन्टींग मध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यावर या सर्वांना सुखद धक्का बसला.. तिथे भोजनाची तयारी दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधे पणा जपत भोजन  केले असून आपल्याला देण्यात आलेला निरोप म्हणजे स्नेहभोजनाचे विशेष निमंत्रण होते; याचा उलगडा होऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. खुद्द पंतप्रधान यांनी अशा तऱ्हेने आश्चर्यचकित करून सोडल्यामुळे अन्य खासदार देखील अचंबीत आणि आनंदित होणे स्वाभाविक होते.

 

 

 

क्षणातच गंभीर वातावरण पालटून गेले आणि उल्हासित आनंदी गप्पाटपांमध्ये रूपांतरित झाले.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलखुलास पणे अ राजकीय गप्पा केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास निमंत्रित केलेल्या दोन महिला खासदारांपैकी डॉ हिना गावित या महाराष्ट्रातील एकमेव महिला खासदार होत्या. नंदुरबारच्या खासदार डॉ हिना गावित या अधिवेशनानिमित्त सध्या दिल्लीत असून संसदेत केलेल्या विशेष भाषणामुळे सलग तिसऱ्यांदा त्यांनी देशाचे लक्ष वेधले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चाललेल्या कामांची माहिती याप्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली

 

 

 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने देखील सध्या दिल्लीच्या वर्तुळात खासदार डॉक्टर हिना गावित यांचा बोलवाला आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील डॉक्टर हिना गावित यांच्या प्रगती पुस्तकावर विशेष लक्ष असल्याचे या प्रसंगातून नमूद झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेहभोजनाला निमंत्रित केलेल्या या खासदारा ंसह वैयक्तिक डॉक्टर हिना गावित यांच्याशी सुद्धा लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांविषयी चर्चा केली माहिती घेतली. दिल्ली वर्तुळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचा असलेलं विशेष वजन या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद पोलीसांनी एक लाखाचा गुटखा केला जप्त, एकास अटक

Next Post

नंदुरबारात आजपासून रंगणार नाट्याविष्कार हस्ती-जिभाऊ करंडकच्या माध्यमातून रसिकांसाठी ११ एकांकीकांची मेजवानी

Next Post
हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर,प्रथमच विनोदी एकांकिकासाठी सांघिक पारितोषिक

नंदुरबारात आजपासून रंगणार नाट्याविष्कार हस्ती-जिभाऊ करंडकच्या माध्यमातून रसिकांसाठी ११ एकांकीकांची मेजवानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group