नंदुरबार l प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा तर्फे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असं बेताल वक्तव्य राहुल गांधी मार्फत करण्यात आले त्याच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, भाजपा महामंत्री डॉक्टर सपना अग्रवाल, विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र पाटील, जिल्ह्या सचिव भीमसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष माणिक माळी,
जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा सचिव मनीषा निकम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सविता जयस्वाल, रेखा चौधरी, सरिता चौधरी, शितल मराठे, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, सहकार सेल जिल्हा अध्यक्ष के डी गिरासे, शहराध्यक्ष कुशल चौधरी, शहर उपाध्यक्ष अजय राजपूत, युवा मोर्चाचे जयेश चौधरी,वरुण गावित, सचिन कोटवाय, योगेश शर्मा आदी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.