Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी महाविद्यालय रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबीर तिखोरा येथे उत्साहात

team by team
February 3, 2024
in शैक्षणिक
0
कृषी महाविद्यालय रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबीर तिखोरा येथे उत्साहात

शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तिखोरा ता. शहादा येथे नुकतेच संपन्न झाले.

सरपंच सौ.कल्पनाताई सोनवणे व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. गावातील मंदिर परिसरात स्वयंसेवकांकडून स्वच्छता करण्यात आली.गावठाण परिसरात विविध वनवृक्षांचे रोपण करण्यात आले. गावाची आराध्य दैवत पद्मावती मातेच्या मंदिरात स्वच्छता करून विविध फळ, फुल व वनवृक्षांचे रोपण करण्यात आले.

शेतकऱ्यांसोबत शिवार फेरी करून विद्यार्थ्यांनी गावाच्या पीक परिसंस्थेची माहिती घेतली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील परसबाग विद्यार्थ्यांनी सुशोभित केली.सदर कार्यक्रमात विविध विषयांवर विषय तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.कार्तिक कोळी यांनी भारतीय निवडणूक प्रक्रिया व लोकशाहीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.प्रा.राकेश कापगते यांनी पशुधन विकास व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक बांधिलकी ग्रामविकास, श्रमसंस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजू करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग व गावातील नागरिक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय गवांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील,उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा .मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँगेसच्या गटनेत्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार आज मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते

Next Post
शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार आज मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते

शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार आज मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add