नंदुरबार l प्रतिनिधी
अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्ताने श्रीराम नाम पालखी शोभायात्रेचे आयोजन सोमवार २२ जानेवारी सकाळी ७:०० वाजता मोठा मारुती मंदिरापासून करण्यात आले आहे.
‘राम से पहले राम का नाम’ या उक्तीप्रमाणे सर्व रामभक्त अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी रामनाम जप करत पालखीतून श्रीराम यांची ‘श्रीरामनाम पालखी शोभायात्रा’ काढत आहेत. शोभायात्रा श्री मोठा मारुती मंदिर, शक्ती सागर चौक, दादा गणपती, देसाईपुरा, सिद्धिविनायक मंदिर चौक, मंगळ बाजार, नेताजी सुभाषबाबू पुतळा, राजस्थान हॉटेल, रायसिंगपुरा, अमर थिएटर, नाट्यमंदिर मार्गे श्री मोठा मारुती मंदिर या ठिकाणी शोभा यात्रेची सांगता होईल.
तद्नंतर प्रभू श्रीरामचंद्र यांची महाआरती रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसाने सांगता होईल. तरी सर्व हिंदु बंधू- भगिनींनी या आध्यात्मिक शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त रामभक्त आणि हिंदु सेवा सहाय्य समितीकडून करण्यात आले आहे.