Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडाकेबाज कारवाई: अवैध धंदयांविषयी माहिती मोबाईलवर कळवा : पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे जिल्हा वासियांना आवाहन

team by team
January 6, 2024
in क्राईम
0
धडाकेबाज कारवाई: अवैध धंदयांविषयी माहिती मोबाईलवर कळवा : पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे जिल्हा वासियांना आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन ऑल आऊट राबवित नाकाबंदी करीत कारवाई करण्यात आली.जिल्हयात अवैध बेकायदेशीर धंदयांविषयी कुठल्याही प्रकारची माहीती सामान्य नागरिकांना अवगत असल्यास त्यांनी 9849065629 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ कळवावे असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.पोलीस अधीक्षक यांच्या नियुक्तीला अवैध धंदा वाल्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी पदभार घेताच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यात आले आहे.दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 3 जानेवारी सायंकाळी 8 ते 6 जानेवारी चे सकाळी 6 वा. दरम्यान जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट / कोंबींग / नाकाबंदी राबविण्यात आली.

 

 

 

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविणेबाबत नियोजन केले होते. सदर ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान अवैध धंदयांविरुध्द तसेच पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, स्टॅडींग वॉरंट, फरार, पाहिजे आरोपी तसेच बेलेबल व नॉन बेलेबल वॉरंट बजावणी या बाबींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सुचना पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी केले होते.त्यानुसार 3 दिवसाचे ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान संपूर्ण जिल्हयात पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तीन दिवसात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत अवैध जुगाराचे विरुध्द 33 कारवाया करण्यात आल्या असुन त्यामध्ये एकुण 72 हजार 680 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत अवैधरित्या दारुची विक्री व वाहतुक करणा-यांविरुध्द 61 कारवाया करण्यात आले असुन त्यामध्ये एकुण 11 लाख 1 हजार 270 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहिजे फरार व स्टॅण्डींग वॉरंट आरोपींपैकी एकुण 29 इसमांना अटक करण्यात आली आहे.

 

 

बेलेबल व नॉन बेलेबल वॉरंट असे एकुण 124 बजावणी करण्यात यश मिळाले आहे.
अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर हे वाहनांमध्ये गॅस भरणेकामी वापरणा-यांविरुध्द जिवनाश्यक वस्तु कायदयान्वये कारवाई करुन 2 लाख 13 हजार रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

तसेच यापुढेदेखील अवैध धंदयांवर जिल्हयात वेळोवेळी कडक कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी संपुर्ण जिल्हा पोलीस दलास सक्त सुचना दिल्या आहेत.

 

 

 

अवैध बेकायदेशीर धंदयांविषयी कुठल्याही प्रकारची माहीती सामान्य नागरिकांना अवगत असल्यास त्यांनी मो.क्र. 9849065629 या क्रमांकावर तात्काळ कळवावे, आपली ओळख माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस यांनी नंदुरबार जिल्हावासियांना आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाढदिवसाचा खर्च टाळत काथर्दे खुर्द जि. प शाळेला साऊंड सिस्टिम भेट

Next Post

भालेर येथील कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Next Post
भालेर येथील कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

भालेर येथील कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add