नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमीत्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम आज दि. ६ जानेवारी शनिवार रोजी सकाळी ११ वा. नेहरुनगर येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता.
पत्रकार दिनाचा कार्यक्रम हा सर्व पत्रकारांसाठी एक आनंदाचा दिवस असतो. या दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पत्रकार एकमेकांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देवून हा दिन उत्साहात साजरा करतात. सालाबादाप्रमाणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे नेहरु नगर येथील पत्रकार भवनात आज सकाळी ११ वा. पत्रकार दिनानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा कार्यक्रम हा साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. कारण आपल्यातील एक उमदा पत्रकार कै. रविंद्र चव्हाण यांचा अल्पवयात मृत्यू झाल्याने ते आपल्याला सोडून निघून गेले. त्यांच्याप्रती सद्भावना म्हणून यंदाचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम कुठलाही गाजावाजा न करता, राजकिय व्यक्तिला अथवा शासकिय अधिकार्यांना न बोलवता साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरी सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, उपाध्यक्ष रमेश महाजन, पत्रकार संघाचे समन्वयक विशाल माळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रमुख भिकेश पाटील, साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे व साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी केले आहे.








