नंदुरबार | प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेच्या 11 गट व 13 गणांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत सरासरी 67.15 टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
जिल्हा परिषदेच्या ५६ गट आणि ११२ गणांसाठी डिसेंबर २०१९ मध्ये निवडणूका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी २३ तर शिवसेनेने ७ व राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळविला होता. मात्र, मार्च महिन्यात आरक्षणाच्या मुद्दयावरुन जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील ११ उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे पोटनिवडणूकीची प्रक्रिया घेण्यात येत आहे. आज यासाठी मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत जिल्हयात सरासरी 67.15 टक्के मतदान झाले गट व १३ पंचायत समिती गणांसाठी आज मतमोजणी . या निवडणूकीसाठी २ लाख ८२ हजार ३८७ मतदार होते. त्यापैकी एकुण १ लाख 89 हजार 634 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 97हजार 564 पुरुष तर 92 हजार 70 महिला मतदारांचा समावेश होता.