नंदुरबार l प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून कन्साई ता. शहादा गावाच्या परिसरात रोज बिबट्या पाहावयास मिळत आहे.
सदर बाब लक्षात घेऊन काल कन्साई ग्रुप ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच रवींद्र खळे व प्रा.डॉ. साहेबराव ईशी यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय शहादा येथील कर्मचारी विक्रम पानपाटील यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. कन्साई परिसरात आढळणारा बिबट्या मुळे कधीही जीवित हानी होऊ शकते त्यामुळे त्याला जेरबंद करणं महत्त्वाचे आहे असे पटवून दिले.
सदर गोष्टीची दखल घेऊन विक्रम पानपाटील यांनी परीमंडळ दरा चे राऊंड ऑफिसर श्रीमती आर.बी मोरे, यांच्याशी बोलणे करुन दिले.श्रीमती आर.बी मोरे व शासकीय वाहन चालक नईम मिर्झा यांनी सदर बिबट्या ज्या ज्या ठिकाणी आढळतो त्या ठिकाणी त्वरित भेट देऊन पाहणी केली.सदर पाहणी दरम्यान श्रीमती मोरे व श्री.मिर्झा यांनी जर का बिबट्या दिसला तर त्वरित आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन करत बिबट्याला लवकरकच सापळा रचून जेबंद करण्याचे आश्वासन दिले.
सदर पाहणी दरम्यान श्रीमती आर.बी मोरे, वनपाल दरा तसेच शासकीय वाहन चालक नईम मिर्झा, प्रा. डॉ. साहेबराव ईशी, रवींद्र खर्डे (उपसरपंच कनसाई), ग्रामस्थ वींद्र पाडवी आदी उपस्थित होते.








