म्हसावद । प्रतिनिधी:
सावित्रीबाई फुले नगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ४, नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ नंदुरबार संलग्न महाराष्ट्र राज्य यांच्या द्वारे जिल्हास्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली.
स्पर्धेची सुरुवात प्रतिमापूजनाने मीनाक्षी भदाणे मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक विद्यामंदिर यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे दासू कोकणी मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले न.पा. शाळा क्र. ४ नंदुरबार यांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले.
बॉक्स लंगडी हा जुनाच खेळ असून त्यात काही नियम बदल करण्यात आले आहेत.दोन्ही पायांनी प्रत्येकी एक वेळेस लंगडी करून समोरच्या खेळाडूंना बाद करण्याच्या विविध नवीन नियमांविषयी सचिव करणसिंग चव्हाण यांनी उपस्थितांना माहिती देत डेमो करून दाखविला.
यावेळी जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले न.पा. शाळा क्र. ४, नंदुरबार, नगरपालिका शाळा क्र. ७, नंदुरबार, के.डी. गावित सैनिकी प्राथमिक शाळा पथराई,आदर्श प्राथमिक विद्यामंदिर नंदुरबार, काकासाहेब प्राथमिक शाळा नंदुरबार, मो.क. रघुवंशी प्राथमिक शाळा नंदुरबार,नगरपालिका शाळा क्र. १२ नंदुरबार, प्राथमिक विद्यामंदिर कोकणी हिल दुधाळे,आदी अनेक शाळांनी जिल्हास्तरीय बॉक्स लंगडी निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
यात प्रथम क्रमांक मुले सावित्रीबाई फुले न.पा. प्राथमिक शाळा क्र. ४, नंदुरबार तर द्वितीय क्रमांक पथराई सैनिकी शाळा यांनी तर मुलींमध्ये सावित्रीबाई फुले न.पा. प्राथमिक शाळा क्र. ४, नंदुरबार यांनी तर द्वितीय क्रमांक आदर्श प्राथमिक विद्यामंदिर यांनी मिळवला. या निवड चाचणी स्पर्धेतून चांगले स्पर्धक निवडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई चेंबूर येथे दिनांक २७ डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातून बॉक्स लंगडी या खेळासाठी रवाना होणार आहे.
असे जिल्हा सचिव करणसिंग चव्हाण यांनी सांगितले लंगडी स्पर्धा पार पाडण्यासाठी नंदुरबार जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे सचिव करणसिंग चव्हाण, कार्याध्यक्ष शांताराम पाटील,स्पर्धा प्रमुख शिरीष पवार, सचिन आव्हाड, तुषार सोनवणे, निलेश बागुल, सतीश काटके, सुनील बोरसे, शेखसर, हरीश चौधरी, सतीश पाटील, नितेश नाथजोगे आदींचे सहकार्य लाभले.तसेच छत्रपती पुरस्कार प्राप्त बळवंत निकुंभे, योगेश निकुंभे यांचीही उपस्थिती लाभली.स्पर्धा व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष पवार यांनी केले.