नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये नाताळनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

नृत्य करताना सांताक्लॉज. यावेळी सांताक्लॉजने उपस्थित विद्यार्थ्यांना अभिवादन करत हात मिळविले व विद्यार्थ्यांमध्ये एकत्रित होत नृत्यात सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापिका नूतनवर्षां वळवी यांनी केले.








