Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्यवसायात यशमिळविण्यासाठी सातत्य व चिकाटी गरजेची : ज्ञानेश्वर साळुंखे

team by team
December 24, 2023
in राज्य
0
व्यवसायात यशमिळविण्यासाठी सातत्य व चिकाटी गरजेची : ज्ञानेश्वर साळुंखे

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्रात सुरु असलेल् या १७ व् या कृषि तंत्रज्ञान महोत् सवात दि. २३ डिसेंबर २०२३, शनिवार रोजी कृषि उद्योग परिषदेव्दारे तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

 

 

 

कृषि उद्योग परिषदेत अध्यक्ष स्थानी डॉ. नितीन पंचभाई, सचिव, डॉ. हेडगेवार सेवा समिती, विशेष अतिथी म्हणून कृष्णदास पाटील, अध्यक्ष, डॉ. हेडगेवार सेवा समिती, पाटीलभाऊ माळी, धनराज कातोरे, विश्वस्त, डॉ. हेडगेवार सेवा समिती, तांत्रिक मार्गदर्शक ज्ञानेश्वर साळुंखे, धृव केमिकल्स, धुळे, पी. एल. पाटील, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, शहादा, आदी उपस्थित होते.

 

 

 

 

प्रास्ताविकात राजेंद्र दहातोंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी तंत्रज्ञान महोत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती उपस्थिताना दिली. यावेळी कृष्णदास पाटील यांनी कृषि शिक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पंचभाई यांनी शेतीत यशस्वी होण्यासाठी कृषि शिक्षण, कृषि व्यवसाय व पशुधन हे महत्वपूर्ण घटक असल्याचे सांगितले. कृषि उद्योग परिषदेत ज्ञानेश्वर साळुंखे, धृव केमिकल्स, धुळे यांनी स्वतः व्यवसाय भरण्यासाठी आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात आणि आज धृव केमिकल्सचा व्यवसाय कशा पद्धतीने चालत आहे हा प्रेरणादायी प्रवास उपस्थितानासमोर कथन केला.

 

 

 

 

यावेळी त्यांनी २०१३ मध्ये गायीच्या गोठ्यात सुरु केलेली कंपनी आज तीन एकरवर उभी असून कृषि व्यवसाय करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. पी. एल. पाटील, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, शहादा यांनी कृषि शिक्षण घेऊन व्यवसायाच्या कोण-कोणत्या संधी आहे याविषयी मार्गदर्शन केले.

 

 

कृषि उद्योग परिषदेसाठी मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी व शहादा येथील कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पद्माकर कुंदे, केंद्र संयोजक, मुक्त शिक्षण केंद्र, कोळदा, नंदुरबार यांनी केले. विजय बागल, कार्यक्रम सहायक, कृषि विज्ञान केंद्र यांनी आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेकिंग न्यूज : दारू वाहतुकीसाठी 10 हजाराची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह शिपायास रंगेहाथ अटक

Next Post

नृत्यात सहभागी झाला सांताक्लॉज

Next Post
नृत्यात सहभागी झाला सांताक्लॉज

नृत्यात सहभागी झाला सांताक्लॉज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add