नंदुरबार l प्रतिनिधी
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथील दत्त धाम येथे श्री.गुरुचरित्र पारायणास सुरुवात महुरानिपुर येथील पंच अग्नी आखाड्याचे पिठाधिश ब्रह्मचारी सोमेश्वरानंदजी यांच्या हस्ते झाली.
वीस डिसेंबर ते २५ डिसेंबर श्री गुरुचरित्र पारायण होईल . श्री गुरुचरित्र पारायण येथील पुजारी वेद मूर्ती दिनेश प्रेमचंद मुळे हे करीत आहेत.२५ डिसेंबर रोजी दुपारी श्री गुरुदत्त जन्मोत्सव नंतर भंडाराच्या आयोजन करण्यात आले आहे. येथे महूरानीपुर झाशी येथील पंच अग्नी आखाड्याचे पीठाधीश श्री श्री १००८ महंत जोगेश्वरानंदजी यांच्या हस्ते १२ डिसेंबर १९८७ रोजी दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
येथील पुजारी प्रेमचंद भागवत मुळे यांनी गुरुवर्य श्री श्री १००८ महंत जोगेश्वरानंद यांच्या आज्ञेने या ठिकाणी १०८ गुरु पारायण केले. डिसेंबर १९८५ ला मंदिरात एका जागेवर बसून सर्व नियम पाळत श्री.गुरुचरित्र पारायण पूर्ण केले १२ डिसेंबर १९८७ रोजी श्री दत्तगुरु महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
तेव्हापासून दरवर्षी श्री गुरुचरित्र पारायण व श्री दत्त महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. समाप्तीनंतर आरती होऊन दत्त श्री दत्त भगवानची जोडी फिरवली जाते नंतर संपूर्ण ग्रामस्था तर्फे भंडाराच्या आयोजन केला जाते. श्री दत्त जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष श्रावण पायमोडे, माधव बेंद्रे, रघुनाथ बोराणे यांचे मोलाचे सहकार्य लाभते .