नंदुरबार l प्रतिनिधी
न्युक्लिअस बजेट अर्थात केंद्रवर्ती अर्थसंकल्पातील क गटात मोडणाऱ्या मानव साधन संपत्ती विकासाच्या योजनांसाठी अर्ज सादर करण्यासाठी 29 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील अनुसुचित जामाती बहुल ग्रामपंचायती, बचतगट, भजनी मंडळ यांना न्युक्लियस बजेट अंतर्गत क गटातील मानव साधन-संपत्ती विकासाच्या उपक्रमातील सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांड्यांचे संच, भजनासाठीचे साहित्य तसेच बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी अर्थसहाय्याच्या योजना राबवल्या जाणार आहेत. त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याची मुदत 22 डिसेंबर 2023 होती, ही मुदत आता 29 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचेही श्री. पत्की यांनी कळविले आहे