Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिव उद्यान धाममध्ये साकारणार २१ फुटांची महादेवाची मूर्ती : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
December 21, 2023
in राजकीय
0
शिव उद्यान धाममध्ये साकारणार २१ फुटांची महादेवाची मूर्ती : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूतील मोकळ्या मैदानात शिव उद्यान धाम बनविण्यात येणार असून, या ठिकाणी २१ फुटांची काळ्या पाषाणाची महादेवाचे भव्य मूर्ती साकारण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.येत्या ७ ते ८ महिन्यात शिव उद्यान धामाचे काम पूर्णत्वास येईल असेही त्यांनी सांगितले.

नंदुरबार शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी आ.रघुवंशी यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या.यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, पालिकेच्या माध्यमातून शिव उद्यान धाम साकारण्यात येत आहे.या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दोन-चार दिवसात पूर्ण होऊन लगेचच कामाला सुरुवात होईल. नगरपरिषदेच्या माध्यमातून व परिसरातील रहिवाशांच्या लोकवर्गणीतून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार, ५१ शिव मंदिरे बांधण्यात आली असून आता देखील ३३ मंदिरे बांधण्यात येणार आहेत.

सभागृह,ओपन जिमचे उद्घाटन

शहरातील मदन मोहन नगरात सभा मंडप, राजेंद्र पार्क, अवधूत पार्क व धर्मराज नगरात ओपन जिमचे उद्घाटन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार, राकेश हासानी, प्रमोद शेवाळे,अतुल पाटील,जगन्नाथ माळी,मोहितसिंग राजपूत व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

Next Post

तळोदा प्रकल्पातील न्युक्लिअस बजेट योजनांसाठी 29 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार

Next Post
तळोदा प्रकल्पातील न्युक्लिअस बजेट योजनांसाठी 29 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार

तळोदा प्रकल्पातील न्युक्लिअस बजेट योजनांसाठी 29 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add