नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय सैन्यदल, वायुदल व नौदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. त्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड पूर्व प्रशिक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी 2 जानेवारी 2024 रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात 8 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत या प्रशिक्षणाच्या 56 व्या तुकडीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी कुठल्याही प्रकारचे निवास, भोजन व प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार नाही. नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक, पात्र उमेदवारांसाठी 2 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे होणाऱ्या या मुलाखतींसाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनीच शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकांच्या मुळ प्रतिंसह हजर रहावे. मुलाखतीस येताना धुळे जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत अथवा
https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर SSB56 कोर्स सर्च करून त्यावर असलेल्या प्रवेशपत्र नमुन्यासोबत परिशिष्टाच्या प्रतीची प्रिंट काढून ती परिपूर्ण भरून दोन प्रतीत सोबत आणावी.
*यापैकी एक पात्राता आवश्यक …*
◼️कंम्बाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा (NDA-UPSC) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे.
◼️एनसीसी ‘C प्रमाणपत्र ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये उत्तीर्ण असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने ‘एसएसबी’ साठी शिफारस केलेली असावी.
◼️टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्स साठी ‘एसएसबी’ मुलाखतीसाठीचे कॉल लेटर असावे.
◼️ युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी ‘एसएसबी’ कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत उमेदवाराच्या नावाची शिफारस असावी.
वरीलपैकी कोणतीही एक पात्रता धारण केलेल्या उमेदवाराने तसे प्रमाणपत्र सोबत आणावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक training.petenashik@gmail.com इ-मेल वर अथवा दूरध्वनी क्र. 0253 – 2451032 किंवा व्हाट्सॲप क्र. 9156073306 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीव्दारे संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार-धुळ्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश प्रकाश पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.