Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी लिस्टिंग कार्यक्रमाचा विरोधात 20 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन

team by team
December 18, 2023
in राजकीय
0
डी लिस्टिंग कार्यक्रमाचा विरोधात 20 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

डी लिस्टिंग कार्यक्रमाचा विरोधात नंदुरबार येथे 20 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देऊन देखील देवगिरी प्रांत प्रायोजित आणि जनजाती सुरक्षा मंच आयोजित महासंमेलनास शासनाने परवानगी दिल्याबद्दल निषेध नोंदविण्यासाठी , आदिवासींच्या भिन्न जमातींमध्ये धर्मातराच्या नावाखाली तंटा बखेडे लावणाऱ्या संमेलनाच्या आयोजकांवर आणि नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी लेखी मागणी केली होती त्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही , जात आणि धर्म या भिन्न बाबी आहेत याची कल्पना महासंमेलनाच्या आयोजकांना असताना देखील दुसरे धर्म स्वीकारणाऱ्या आदिवासींच्या सवलती काढून घ्याव्यात अशी असंविधानिक मागणी करून आदिवासी समुदायांमध्ये गैरसमज पसरवून नंदुरबार जिल्ह्यातील जिल्ह्यामधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न महासंमेलनाच्या माध्यमातून केला जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी ,

 

 

 

समस्त आदिवासी समाजाच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांमध्ये हिंदू वसावे , हिंदू वळवी अशा नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी देखील धर्म बदललेला आहे , धर्मांतर झालेले आहे असे दाखवून समस्त आदिवासींच्या सवलती काढून घेण्याचा हा कुटील डाव त्यांनी रचलेला आहे त्यासाठी ,शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांनी महासंमेलनाच्या आयोजकांकडू हिंदू आदिवासींचे आरक्षण आम्ही त्यांचे धर्मांतर झाले असल्याचे कारण दाखवून आरक्षण काढून घेण्याची मागणी करणार नाही .

 

 

 

 

असे प्रतिज्ञापत्र घ्यावे , 15 डिसेंबर 2023 राजा विश्राम गृहावर ज्या बिगर आदिवासी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन धर्मांतर केलेल्या आदिवासीचे आरक्षण सवलती काढून घेण्याबद्दल जे निवेदन केले आहे ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनी धर्मांतर केलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती धर्मातराच्या नावाखाली काढून घेता येणार नाही कारण आरक्षण हे जमातीच्या आधारावर देण्यात येते असे न्याय निवाडे दिलेले आहेत . त्यामुळे आयोजकांवर न्यायालयांच्या आदेशाची बेअदबी केल्या प्रकरणी शासनाने गुन्हे दाखल करावे .

 

 

 

 

महासंमेलन झालेच तर त्याचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग समस्त आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना देण्यात यावे ,20 डिसेंबरच्या महासंमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जमाती जमाती मध्ये . अथवा बिगर आदिवासी व आदिवासी जमातीमध्ये वाद भांडणे निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांसह बिगर आदिवासी नेत्यांवर राहील त्यांचेवर रा . सू . का . कायद्यानुसार गुन्हा दाखल करावे ,जनजाती सुरक्षा मंच आयोजित महासंमेलनामध्ये आदिवासी क्रांतिकारक , आदिवासी देव देवता आणि संस्कृती तसेच इतर धर्मियांच्या बाबतीत विकृत सादरीकरण तसेच टीकाटिप्पणी केल्यास संमेलनाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी तसेच 20 डिसेंबर रोजी नंदुरबार येथे होणाऱ्या डी लिस्टिंग कार्यक्रमाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी गो पा दाणेज यांना निवेदन देण्यात आले तसेच 20 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. यावेळी दिलीप नाईक, रोहिदास वळवी, पंकज वळवी, मालती वळवी, प्रियंका पाडवी, अरविंद वळवी आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा लघुउद्योग भारती संघटनेची कार्यकारणी गठीत, जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र चौधरी यांची नियुक्ती

Next Post

शक्ती हनुमान मंदिराचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
शक्ती हनुमान मंदिराचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

शक्ती हनुमान मंदिराचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add