Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा लघुउद्योग भारती संघटनेची कार्यकारणी गठीत, जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र चौधरी यांची नियुक्ती

team by team
December 18, 2023
in राज्य
0
नंदुरबार जिल्हा लघुउद्योग भारती संघटनेची कार्यकारणी गठीत, जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र चौधरी यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार जिल्हा लघुउद्योग भारती संघटनेची कार्यकारणी गठीत, जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र(बाबा) अशोक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.

 

 

लघु उद्योगासाठी चांगले वातावरण तयार व्हावे तसेच लघु उद्योगाच्या माध्यमातून व्यापार वाढावा यासाठी उद्योग हिताने प्रेरित लघुउद्योग भारती नंदुरबार जिल्हा पालक इकाईची स्थापना करण्यात आली.नवस्थापित नंदुरबार शाखेचा नूतन जिल्हाध्यक्ष पदी गजेंद्र(बाबा) अशोककुमार चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी प्रदीप देसाई,सचिव पदी प्रकाश जैन सहसचिव कृष्णा अग्रवाल,तर कोषाध्यक्ष पदी श्याम अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली.

 

 

.
लघुउद्योग भारतीची बैठक नंदुरबार येथील अग्रवाल भवन येथे घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लघुउद्योग भारतीचे राज्य अध्यक्ष रविंद्र वैद्य होते . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय महामंत्री समीरजी साने ,धुळे इकाई चे जिल्हाध्यक्ष वर्धमान सिंघवी ,राहुल कुलकर्णी राजेंद्र जखोडे ,अशोक अग्रवाल ,आदी उपस्थित होते. यावेळी नंदुरबार इकाईचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन त्यांना पदभार सोपवण्यात आला.

 

 

 

यावेळी अध्यक्षीय भाषणात लघुउद्योगचे राज्य अध्यक्ष रविंद्र वैद्य यांनी सांगितले की नव्यानेच लघुउद्योग भारती नंदुरबार शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून नंदुरबार ईकाई चे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्योग वाढीसाठी वातावरण कसे तयार होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच जिल्हा उद्योगाच्या बैठकीत जाऊन सर्व प्रकारची माहिती घेऊन लघु उद्योगाच्या समस्या सोडण्यावर भर देण्यात येईल. सध्या लघु उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात समस्यां निर्माण होताना दिसतात त्या समस्यांचे प्राध्याणाने निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

 

 

 

लघुउद्योग संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात परंतु शासकीय कार्यालयात समस्या सुटल्या नाही तर महाराष्ट्र प्रदेश पातळीवर लघु उद्योगांच्या समस्या सोडवण्यात येतील. लघुउद्योग भारती अखिल भारतीय पातळीवर उद्योगासाठी काम करणारी एकमेव संघटना आहे. या लघु उद्योगाचे जवळपास 547 जिल्ह्यांवर सदस्य असून 70 हजाराच्या वर भारताचे सदस्य आहेत आणि ही अखिल भारतीय संघटना असून पॉलिसी मॅटर मधील समस्या सोडवण्यासाठी ही संघटना कटिबंध आहे असे राज्याध्यक्ष रविंद्र वैद्य यांनी सांगितले. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गजेंद्र अशोक चौधरी यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील लघु उद्योग वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून लघु उद्योगाच्या बाबतीत जे काही समस्या आहे त्या सोडवण्यावर भर देण्यात येईल. या कार्यक्रमाला लघुउद्योग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन गजेंद्र( बाबा)अशोक चौधरी यांनी मांडले

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी पावरा समाज मंडळाचा वार्षिक स्नेहसंमेलन

Next Post

डी लिस्टिंग कार्यक्रमाचा विरोधात 20 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन

Next Post
डी लिस्टिंग कार्यक्रमाचा विरोधात 20 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन

डी लिस्टिंग कार्यक्रमाचा विरोधात 20 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add