नंदुरबार l प्रतिनिधी
येथील समस्त मंडळा तर्फे वार्षिक सेन्ह संमेलन देवमोगरा माता मंदिरात उत्सहात पार पाडला.
या स्नेह संमेलनात आदिवासी पावरा समाजातील पारंपारिक वेशभूषेत सर्व बांधव कुटूंबासह उपस्थित होऊन आदिवासी पावरा समाजातील पारंपारिक नृत्य सादर करीत पावरा समाजातील पारंपारिक जीवनशैली व संस्कृतीचे प्रतीक स्वरूपात प्रदर्शन या कार्यक्रमात दाखविण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने आदिवासी पावरा समाजातील ओळख- पाळख ,बाहेर गावाहून आलेले तसेच समाज मंडळाचे वरिष्ठ सभासद बांधव व भगिनींचे स्वागत पारंपारिक पावरा बोलीभाषेतून एकमेकांशी सवांद साधून सांस्कृतिक विचारांची देवाण- घेवाण स्नेहसंमेलन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात धुळ्याहून प्रा. डॉ. मोहन पावरा,डॉ. भरतसिंग पावरा,धडगावहुन सेवानिवृत्त दुल्लभ रावसाहेब,रतिलाल पावरा, बलराज पावरा,सहभागी झालेत.यावेळी बहादूर पावरा,अर्जुन पटले,सरदार पावरा, मोहन शेल्टे मंडळाचे डॉ.रणजित पावरा,उपाध्यक्ष दिपक पावरा, प्रविण पावरा, सुभाष पावरा, डॉ.मनोज पावरा,डॉ.किसन पावरा,डॉ.प्रताप पावरा,डॉ.संजय पटले,संदीप पावरा,तमन्ना भंडारी,अनिता पटले,सुमन पावरा, विजया पावरा, प्रताप पावरा, इंजि.सायसिंग पावरा,राकेश पावरा,भिमसिंग चव्हाण,विजय पावरा,संतोष पावरा,सेवा पावरा,कांतीलाल पावरा,प्रकाश पावरासह आदींचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.