नंदुरबार l प्रतिनिधी
जनतेच्या हितासाठी मंजूर विकास कामात विरोधकांचेही सहकार्य आवश्यक असते, परंतु राज्यात सत्ता बदलानंतर आघाडीने मंजूर केलेल्या विकास कामांवर सरकारने स्थगिती आणली. या स्थगितीचे पाप हे विकासातील शाप ठरत होते हे पाप करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन आ.ॲड.के.सी पाडवी यांनी पिंपळखुटा ता.अक्कलकुवा येथील कार्यक्रमात केले.
स्थगिती उठवल्यानंतर धडगाव पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील विकास कामांचेही भूमिपूजन आ.ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त पिंपळखुटा (ता.अक्कलकुवा) येथे काॅंग्रेसची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रतन पाडवी, ॲड.गोवाल पाडवी, माजी जि.प.सदस्य सिताराम राऊत, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जि.प.सदस्य निर्मला राऊत, जान्या पाडवी, सभापती नानसिंग वळवी, विक्रम पाडवी, उपसभापती मेलदीबाई वळवी, अमृत वळवी, संरपंच दिलीप राऊत, वाण्या वळवी, माजी सभापती बिज्या वसावे, माजी उपसभापती पिरेसिंग पाडवी, युवक काँग्रेसचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष निलेश पाडवी, धडगाव तालुकाध्यक्ष पोपटा वसावे, विलास पाडवी, सुरेश वळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वसावे, नुरजी वसावे, शिवराम वळवी, धिरसिंग वसावे, सरपंच सोन्या वसावे, पोहल्या वसावे, सखाराम पाडवी, जगदिश तडवी, विकास तडवी, सरपंच वनिता तडवी, संगिता नाईक, दंगीबाई वसावे, गणपत पाडवी, उपसरपंच रमिला राऊत, रमेश वसावे, विजयसिंह वसावे यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान बिज्या वसावे, निलेश पाडवी, ॲड.धिरसिंग पाडवी, धिरसिंग वसावे, नुरजी वसावे, कुवरसिंग वळवी यांनी मार्गदर्शन केले.
कॉंग्रेस हा स्वातंत्र्य देणारा पक्ष
कॉंग्रेसने जसे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, तसे प्रत्येक क्षेत्रात जनतेला स्वातंत्र्य देणारे म्हणून कॉंग्रेसकडे पाहिले जाते. काही पक्षाने व्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही व अन्य घटकातून जनतेला धोका निर्माण केला आहे, असे म्हणत जि.प.सदस्य निर्मला राऊत यांनी सर्वांनी कॉंग्रेस सोबतच राहावे असे आवाहन केले.

खड्डे बुजविणाऱ्यांचे कौतुक परंतु त्यांना मदत करणाऱ्यांवर टिका
योजनांचा लाभ मिळवून देत असल्याचे दाखवण्यासाठी काही नेते अधिकाऱ्यांना हाताशी घेत साहित्य वाटत आहेत. दुसऱ्या बाजूने तेच आपल्या समाजाला धोक्यात आणत आहे, समाज वाचवण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी असे म्हणत रतन पाडवी यांनी केवळ श्रेय घेणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे असे आवाहन केले. तर रस्त्यांवरील खड्डे बुजविणाऱ्यांचे कौतुक करतांना सी.के.पाडवी यांनी खड्डे बुजविण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या कामांचा समाचार घेतला. त्यात खड्डे बुजवण्यासाठी युवकांना ज्यांनी मदत केली त्यांनी आधी त्यांनीच केलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, असे म्हणत कामे न करताच निधीही काढला अशी टिका सी.के.पाडवी यांनी केली.
भूमिपूजन झालेले रस्ते
१. पिंपळखुटा ते बर्डी, वेहगी, हुणाखांबमार्गे बोगदा रस्ता
२. तोलवापाड ते पिंपळखुटामार्गे काकडतीपाडा रस्ता
३. पिंपळखुटा ते उकलपाडा रस्ता व जलनिस्सारणचे काम
४. हुणाखांब ते मोकसमाळ रस्ता
५. उकलापाडा ते आंबाईपाडा रस्ता








