Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे बसची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

team by team
December 9, 2023
in क्राईम
0
तळोदा येथे बसची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

गुजरात राज्य परिवहन च्या बसच्या धडकेत मोटरसायकलवरील महिलेचा मृत्यू झाला असून मयतेचा पती जखमी झाल्याची घटना तळोदा येथे घडली.

या बाबत सविस्तर वृत्त असे की तळोदा येथील शनी गल्लीत राहणार अभिजित किसनसा कलाल व सौ. अवंतीका अभिजित कलाल हे त्यांच्या मोटर सायकल ने नंदुरबार येथे दवाखान्याच्या कामासाठी जात असतांना त्यांच्या मिशन स्कुल मध्ये शिकणाऱ्या मुलाला भेटून बायपास मार्गे जात असतांना बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर त्यांच्या मोटरसायकलला मागून येणाऱ्या गुजरात राज्य परिवहन अंकलेश्वर डेपोच्या बस ( क्र. जी जे 18झेड8409) ने मागून धडक दिल्याने

मोटरसायकल वरील सौ.अवंतिका कलाल व अभिजित कलाल गंभीर जखमी झाले त्यात सौ. अवंतिका कलाल ह्या मोटर सायकल वरून दूर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली त्याचवेळी आजूबाजूचे लोक व इतर वाहनचालकानी त्यांना रुग्णालयात नेले मात्र दवाखान्यात नेत असतांना 38 वर्षीय अवंतिका कलाल यांचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. अभिजित कलाल यांच्यावर पुढील उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. सौ अवंतिका कलाल यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा
Previous Post

कुढावद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

Next Post

कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपलेल्यांना ब्लॅंकेट वाटप,तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपचे माणुसकीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add