शहादा l प्रतिनिधी
नाशिक विभागीय युवा महोत्सव 2023 नाशिक येथे जल्लोषात संपन्न झाला.यांत पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला प्रकारांना राज्य स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.
विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत धुळे ,जळगाव नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातून विजयी संघांनी आप-आपल्या कला व कौशल्ये सादर केली.या स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील विजेत्या संघांनी विविध प्रकारात अप्रतिम नृत्य, गीते व कौशल्ये प्रकार सादर केली. त्यापैकी महाविद्यालयातून सामूहिक लोकगीत कला प्रकारात कनिष्ठ महाविद्यालयातील संघाने राजस्थान (मारवाडी) ‘म्हारी हाथेळ्या रे बीच’ ह्या लोकगीताने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली.हीमगौरी मोरे ह्या विद्यार्थिनीने ‘चिरमी म्हारी चिरमिली’ ह्या राजस्थानी गीतावर वैयक्तिक लोकनृत्य सादर केले.

ह्याच वैयक्तिक लोकनृत्याला प्रथम क्रमांक मिळाला व आता राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधि्त्व करेल.वैष्णवी बोरसे ह्या विद्यार्थिनीने ‘हाय बाली उमरिया मे हाय बियाही के आयी’ हे वैयक्तिक लोकगीत सादर केले. ह्या वैयक्तिक लोकगीताने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.नंदूरबार जिल्ह्यातील स्पर्धकांनी संपादन केलेले घवघवित बघून स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नंदूरबार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी देखील कौतुकाची थाप दिली.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने कलेचे नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले असून विभागीय पातळीवरून महाराष्ट्र राज्य पातळीवर अभिनंदनीय निवड झाली आहे.
या यशस्वी वाटचालीसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस. पाटील उपप्राचार्य डॉ.एस.डी. सिंदखेडकर डॉ. एम. के्. पटेल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ. कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा .के .एच. नागेश व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून महाराष्ट्र राज्य पातळीवर कला प्रकाराचे सादरीकरण करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला आहे.








