नंदुरबार l प्रतिनिधी
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे गोगामेडी येथील राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंहजी शेखावत यांची मंगळवारी दुपारी अज्ञात समाजकंटकांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या भ्याड हल्ल्याचा ऑल इंडिया पब्लिक सर्विस एम्प्लॉईज युनियन आणि राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात रणजितसिंग राजपूत यांनी म्हटलेे आहे की, सदर घटनेमुळे राजपूत समाजाचे प्रखर आणि वादळी नेतृत्व हरवले आहे.राजपूत समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंहजी गोगामेडी यांची निर्घृण हत्या करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर फास्टट्रॅक कायद्याअंतर्गत अतिशीघ्र कारवाई करण्यात यावी.केवळ राजपूत समाज नव्हे तर इतर समाजासाठी प्रभावी नेतृत्व असलेले सुखदेवसिंहजी शेखावत यांच्या हत्येचा नंदुरबारसह राज्यातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.








