शहादा l प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाचा विजयोत्सव भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री साजरा करण्यात आला.
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकाल निवडणूक आयोगाच्या वतीने रविवारी घोषित करण्यात आले.चारपैकी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री ७:४५ वाजता एकाच वेळी मलोणी येथील मुरली मनोहर काॅलनी परिसरात असलेल्या श्रीराम चौक, शहरातील चार रस्ता पाणी टाकी जवळ, कुकडेल परिसरातील चावडी चौक व भवानी चौक, दोंडाईचा रस्ता स्टेट बँक चौक, डोंगरगाव रस्ता अहिंसा चौक येथे आतषबाजी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहादा शहर, तालुका व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यांत जितेंद्र जमदाडे, विनोद जैन,राजेंद्र अग्रवाल, विजय पाटील, शांतीलाल पाटील, श्रीराम पाटील, निलेश पाटील,कल्पेश पटेल,के.डी.पाटील, गणेश पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, विनोद जैन, संजय चौधरी, योगेश पाटील, डॉ.हर्षल विभांडिक, अॅड.दीपक जैस्वाल, रमाशंकर माळी, सतीष जव्हेरी,पंकज सोनार, कमलेश जांगीड,अनामिका चौधरी,नंदा सोनवणे, रोहिणी भावसार, वंदना भावसार,घनश्याम पाठक, काशिनाथ सोनार, धनंजय पाटील,अंकुर पाटील, योगेंद्र जमादार, सुरजितसिंग राजपाल, प्रकाश कुलकर्णी, योगेश डामरे, प्रभाकर पाटील, श्रीकांत जाधव, हेमराज पवार, मयूर जैन आदिंची उपस्थिती होती.