नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेत डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचालित अनु.आश्रमशाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथील 14 वर्षातील मुलीचा खो खो संघ नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे सुरु असलेल्या क्रीडा स्पर्धेत नंदुरबार तालुका विरुद्ध नवापूर तालुका ह्या सामन्यात नंदुरबार तालुक्याच्या संघाने विजय संपादन करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.14 वर्षातील 600 मी.धावणे यात कु. रोशनी कोकणी प्रथम 17वर्षातील 3000 मी. धावणे यात कु. कुलदीप वसावे प्रथम,800मी. धावणे कु. प्रियंका वसावे द्वितीय विजयी खेळाडूंना
संस्थेचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, सचिव डॉ. नितीन पंचभाई, शाळेचे मुख्याध्यापक प्रविणकुमार सोनवणे, प्रमोद सूर्यवंशी यांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विजेत्या संघास अनिल रौंदळ, योगेश निकुंभ यांनी मार्गदर्शन केले.