नंदुरबार l प्रतिनिधी
तीन राज्यात भाजपाला मिळालेल्या यशामुळे जिल्हाभरात भाजपातर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला.
मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या तीन राज्यात भाजपाने निवडणुकीत मोठे यश संपादित करत सत्ता स्थापन केली. सर्व एक्झिट पोल फेल करत मोठ्या संख्येने अपेक्षेपेक्षाही जास्त जागा जिंकत विजय मिळवला आहे. या विजयाचा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे ढोल ताशे वाजवत, फटाक्याची आतिषबाजी करत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष निलेश माळी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सपना अग्रवाल, महेंद्र भाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, काजल मच्छले,प्रवीण गुरव जिल्हा सचिव भीमसिंह राजपूत, संजय साठे, प्रतिभा चौधरी मनीषा निकम, संगिता सोनवणे, बि डी पाटील, रघुनाथ भाई पाटील, अजय राजपूत, खुशाल चौधरी, जयेश चौधरी, सागर चौधरी, अर्जुन मराठे, जितेंद्र पगारे, प्रशांत पाटील, सरीता चौधरी, शितल मराठे, कैलास भावसार सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.