नंदूरबार l प्रतिनिधी
कोळी समाज बांधवांना टोकरे कोळीचा दाखला देऊन अनुजातीत समावेश करावा. या मागणीसाठी जळगांव ,धुळे ,नंदुरबार जिल्हयासह इतर जिल्ह्यातील कोळी समाज बांधव गेल्या 17 नोव्हेंबर पासून मुंबई मंत्रालयात पदयात्रेने रवाना झाले आहेत.
हजारोंच्या संख्येने रवाना झालेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी अन् पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समशेरपुर तालुका नंदुरबार येथील 20 हून अधिक समाज बांधव मुंबई मंत्रालयाकडे आज दि२७ रोजी रवाना झालेत.
शासनाच्या दुप्पीट धोरणे मुळे वर्षानुवर्षे कोळी समाजाची मागणी रखडली असून या मागणीला शासन दरबारी अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही. याबाबतीत अनेक आंदोलने समाज बांधवांनी केले आहेत. गेल्या ८\१० वर्षापूर्वी धुळे येथे झालेल्या जनआक्रोश आंदोलना प्रसंगी वडाळी येथील एका समाज बांधवांला निढळया छातीवर गोळ्या झेलुन शहीद व्हावे लागले होते. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. वर्षानुवर्षे सदर मागणीचा तगादा शासन दरबारी लावला जात असूनही. आश्वासनाच्या; पलीकडे काहि एक हाती आलेल नाही.
या संदर्भात विद्यमान शासनाने योग्यती दखल घेऊन टोकरे कोळी दाखलच्या माध्यमातून एस.टी.प्रवर्गात कोणतीही अट न ठेवता सरसकट दाखले मीळावीत यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी घोषणा बाजी करत पदयात्रेने मुंबई गाठली आहे त्यात समशेरपुरचे कोळी समाज बांधव देखील सहभागी झाले असून यावेळी मंत्रालयातून रिकामे हाती परतीचा प्रवास करणार नसल्याचा संकल्प मुंबईला रवाना झालेल्या तमाम कोळी समाज बांधवांनी केला आहे.