नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी उद्या दि.५ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या . या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे . जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून २ लाख ८२ हजार ३८७ मतदार हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना सोमवारी साहित्याचे वाटप होईल .
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोटनिवडणुकीमुळे काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे . या पोटनिवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत . दरम्यान जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून २ लाख ८२ हजार ३८७ मतदार हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ३९ हजार ५४८ महिला आणि १ लाख ४२ हजार ८३९ पुरुष मतदार आहेत. प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे उद्या दि.५ ऑक्टोंबर ला मतदान तर ६ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.रविवारी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या . या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झालेली दिसून आली.अनेक नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता.या निवडणुकीत रघुवंशी व गावीत कुटुंब मैदानात उतरले आहे.आमदार डॉ . विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा डॉ . सुप्रिया गावित यांनी कोळदा गटातून उमेदवारी केली आहे . त्यांच्या विरोधात आशा समीर पवार शिवसेनेच्या उमेदवार आहे . पंकज प्रकाश गावित कोपर्ली गटातून भाजपतर्फे रिंगणात आहे . हा गट माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र ॲड . राम रघुवंशी यांचा आहे . ॲड. राम रघुवंशी हे शिवसेनेतर्फे रिंगणात आहेत . राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांची पत्नी रेखा सागर धामणे यांना भाजपातर्फे शनिमांडळ गटातून उमेदवारी मिळाली या गटात शिवसेनेच्या जागृती सचिन मोरे रिंगणात आहेत . पालकमंत्री ॲड . के . सी . पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी या खापर गटातून काँग्रेसतर्फे रिंगणात आहे . त्यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी रिंगणात आहेत . तसेच सातपुडा सहकारी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी
जयश्री पाटील लोणखेडा गटातून भाजपतर्फे रिंगणात आहेत . त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या गणेश पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या पत्नी ऐश्वर्या रावल यांनी भाजपकडून कहाटूळ गटातून उमेदवारी दाखल केली आहे . या गटात काँग्रेसच्या मंदा रामराव बोरसे , शिवसेनेच्या प्रतिमा माळी रिंगणात आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाडळदा गटातून मोहन शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे . याच गटात भाजपचे धनराज पाटील हे रिंगणात आहेत .