तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरातील सोनाराच्या दुकानात चांदीच्या गोठ बदलण्यासाठी आलेल्या महिलेची पर्स खुर्चीवरून दिवसाढवळ्या भामट्यांनी लांबवली.या पर्स मध्ये ६० हजार रुपये होते. ही घटना भरदुपारी मेनरोड वर घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, तळोदा तालुक्यातील सोमावल खुर्द येथील सुमित्राबाई धरमसिंग वळवी ही महिला तळोदा शहरातील मेनरोड वरील मधूकर सोनार यांचा ज्वेलरी दुकानात चांदीचे गोठ बदलण्यासाठी आली होती.दुकानात सदर चांदीचे दागिने पाहत असताना आपली पर्स दुकानाचा ओसरीवर ठेवलेल्या खुर्चीवर ठेवली होती.नेमकी चोरट्यांनी ही संधी साधून त्या महिलेची पर्स लांबवली.यात पाचशे रुपयांची नोटा होत्या असे साठ हजाराची रोकड होती.काही क्षणा नंतर सदर महिलेचे खुर्ची वरील पर्स कडे लक्ष गेल्यानंतर पैशाची पर्स लंबविल्याचे लक्षात आले.महिलेने याबाबत तळोदा पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान महिलेची तक्रार ऐकताच पोलिसांनी ज्वेलरी दुकानात धाव घेवून दुकानातील सीसिटीवी फुटेज घेतले आहे.या फुटेज मध्ये चोरटे देखील कैद झाल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान सदर घटना शहरातील मेन रोडवर घडल्याने चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे.