नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील शेतकरी परशराम लाला कोकणी यांचा मुलगा आकाश कोकणी हा म्हशीला चारण्यासाठी घेऊन जात असताना अचानक काल दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान वीज कोसळली या विजेच्या धक्क्याने आकाश बाजूला पडला आणि म्हशीच्या अंगावर विज पडली या घटनेने म्हैस जागीच ठार झाली तर आकाश परशराम कोकणी हा किरकोळ जखमी झाला आहे. यार शेतकरी परशराम कोकणी यांना 60 ते 70 हजारांचं पशुधनाच नुकसान झाले आहे.