नंदूरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खानदेश विभागीय कृषी महोत्सवाचे आयोजन नंदुरबार येथे करण्यात आले आहे . दुसऱ्या दिवशी पशु व गोवंश यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अहिल्याबाई पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील ,पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. प्रफुल पाटील, डॉ. महेश गणपुरे,डॉ तुषार पाटील ,धुळे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते,नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंग रावल ,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाबाई पटेल, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय ठाकरे आदी उपस्थित होते .
यावेळी डॉ. महेश गणपुरे यांनी गायी व पशुंचा आहार यावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दुग्ध व्यवसाय, देशी गोवंश संवर्धन कशाप्रकारे करावे यावर मार्गदर्शन केले. या चर्चासत्राला हजाराच्या वर शेतकरी बांधव उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात आयोजित आरोग्य शिबिरात चे जवळपास 3 हजारावर सेवेकरी व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रोशन भंडारी, डॉ. तुषार रघुवंशी, डॉ. किसन पावरा ,डॉ. योगेश चौधरी, डॉ. अविनाश पाटील, डॉ. चंद्रशेखर वसईकर, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आदी उपस्थित होते यावेळेस डॉ. चंद्रशेखर वसईकर यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.








