नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी जमा केलेला तीन लाख ३५ हजार रुपयांचा मदतनिधी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला.
तळोदा पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी मुकेश अशोक सावळे यांचा १८ जुलै २०२३ रोजी नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ अपघात झाला होता. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने सुरत येथील युनिटी हॉस्पिटल येथे दाखल
करण्यात आले होते. औषधोपचारासाठी सावळे यांना तातडीची मदत म्हणून जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी स्वेच्छेने वर्गणी जमा करून एक लाख ३० हजार रुपयांची मदत दिली टोनी मकेश मावळे यांची
मृत्युशी झुंज अपयशी ठरली आणि २२ जुलै २०१३ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता, जिल्हा पोलिस दलाकडून स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून केले होते.
त्यानुसार तीन लाख ३५ हजार रुपयांचा मदतनिधी जमा झाला होता. त्या निधीचा धनादेश सावळे यांचा कुटुंबीयांना पी. आर. पाटील यांचे हस्ते देण्यात आला. उपचारासाठी आणि नंतर असा एकूण चार लाख ६५ हजार रुपयांची मदत दिली गेली. आई उषाबाई सावळे व पत्नी प्रतिभा सावळे यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उप अधीक्षक विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे, गोकूळ औताडे, राजेंद्र जगताप, राहुलकुमार पवार सास्थित होते.








