Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खानदेश विभागीय कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात , अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते होणार उदघाटन

team by team
November 3, 2023
in राज्य
0
खानदेश विभागीय कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात , अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते होणार उदघाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्टतर्फे दि . ३ ते ५ नोव्हेंबर रोजी खानदेश विभागीय कृषी महोत्सवाचे नंदुरबारला आयोजन करण्यात येत आहे .या कृषी महोसत्वाचे उदघाटन आज गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता जी टी पी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. सलग ३ दिवस कृषी महोत्सवानिमित विविध कार्यक्रम चर्चासत्र प्रदर्शन व आरोग्य शिबिर होणार आहे .

दि ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहरातील मोठा मारुती मंदीरापासून कृषी दिंडीला सुरुवात होईल. सकाळी साडे १० वाजता जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानात प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल , कार्यक्रमाला नितीन मोरे, चंद्रकांत मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे . पहिल्या दिवशी उद्घाटनानंतरअण्णासाहेब मोरे हे सेवेकऱ्यांशी हितगुज साधणार आहेत.दुपारी ३ वाजेच्या दरम्यान विषमुक्त शेती यावर चर्चासत्र व त्यानंतर सर्व जातीय धर्मियांसाठी वधूवर परिचय मेळावा होईल .

दि .4 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पशू गोवंश या विषयातील तज्ञांचे चर्चासत्र होणार असून दुपारी १२ वाजता आरोग्य शिबिर कुपोषणमुक्त गाव या विषयावर चर्चासत्र होईल . दि . ५ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सकाळी पर्यावरण तज्ञ व सायबर क्राईम या विषयावर चर्चासत्र होईल दुपारी एक वाजता युवक , युवती व शेतकरी व्यावसायीकांकरीता उद्योग व्यवसाय मेळावा असून त्याच दिवशी कृषी महोत्सवाचा समारोप होईल.

या महोत्सवात प्रदर्शन तज्ञांचे चर्चासत्र , खानदेश कृषी अणि पशू गौवंश प्रदर्शन , वनऔषधी रानभाज्या व देशी बियाण्यांचे प्रदर्शन , मोफत आरोग्य शिबिर आणि कुपोषणमुक्त गाव कार्यक्रम होणार आहे . खानदेश विभागीय कृषी महोत्सवाला सेवेकरी , शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र व कृषी संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठी बातमी : उमर्दे येथे गुलाब मराठे यांनी उपोषण सोडले

Next Post

अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना साडे तीन लाखाचा मदतनिधी

Next Post
अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना साडे तीन लाखाचा मदतनिधी

अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना साडे तीन लाखाचा मदतनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add