नंदुरबार l प्रतिनिधी
येथील मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे कोजागिरी पौर्णिमानिमित्त आयोजित गरबा सोबतच मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो महिला, पुरुषांसह तरुण-तरुणींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘मेरी मिट्टी मेरा देश’ ह्या विषयी जमलेल्या नागरिकांना मातृवंदना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर परिसरातील जमलेल्या नागरिकांनी हातात माती धरून सेल्फी घेतल्या.
कार्यक्रमास भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, जिल्हा सचिव नरेंद्र माळी, मनोज माळी, हर्षल माळी, राहुल माळी, संदीप माळी, अक्षय माळी, मनीषा माळी,वंदनाबाई माळी, प्रतिभा माळी, रुपाली माळी, शितल माळी, राजबाई माळी, सुवर्णा माळी आदी प्रमुख उपस्थिती होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाल्या मूळे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक ९ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर, त्याच बरोबर ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना जितेंद्र माळी यांनी मांडली. सूत्रसंचालन संदीप माळी यांनी तर आभार राहुल माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिष माळी, भूषण माळी, रोहित जैन, ऋषिकेश माळी, सचिन माळी, नितीन माळी, रोहित गवळे, राजकुमार माळी, अनिल माळी, प्रशांत माळी, विवेक माळी, सागर माळी, योगेश माळी, किरण माळी आदींनी परिश्रम घेतले.








